तुळजापूर,  दि. ४ :  
श्री.  तुळजाभवानी मंदिर बंद असताना मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि नव्याने उभारण्यात येणारा दर्शन मंडप या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करण्याची मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे यांनी  तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.


कोरोनाची परिस्थिती असून तुळजाभवानी मंदिर अनेक महिन्यापासून बंद आहे, या बंदच्या काळामध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये यापूर्वी प्रशासनाने आणि विश्वस्त मंडळाने मंजूर केलेले दोन विषय मार्गी लावावेत अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे .

यामध्ये तुळजाभवानी मंदिरातून दर्शन झाल्यानंतर बाहेर पाडण्यासाठी नव्याने मार्ग तयार करण्यात यावा आणि नवीन दर्शन मंडपाचे काम सुरू करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे.

श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रचना लक्षात घेता मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पाडण्यासाठी असे दोन वेगवेगळे मार्ग असणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशासनाने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर केले आहेत. मात्र अद्याप काम सुरू केले नाही. सध्या मंदिर बंद असल्यामुळे हे कामे चालू करून आगामी काळात  सोय होण्यासाठी तातडीने  निर्णय घेण्याची मागणी  करण्यात आली आहे.
 
Top