तुळजापुर, दि. ४ : 
तुळजापुर तालुक्यातील बिजवडी येथे गेल्या पंधरा दिवसापासून विद्युतपुरवठा बंद पडला असून तो तातडीने सुरू करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे बिजनवाडी ग्रामस्थांचे खूप मोठी अडचण होत आहे, पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आवश्यक कामे खोळंबली आहेत.

अन्नधान्य दळण करणे हे देखील बंद पडले आहे . शेजारील गावात दळण्यासाठी गेल्यानंतर कोरोना आपत्तीच्या धोक्यामुळे इतर गावांमध्ये दळण देणे बंद केलेले आहे .गावकऱ्याला खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बिजनवाडी  येथील विद्युत पुरवठा दुरुस्त करण्यात यावा, येथील बंद पडलेल्या डीपी तातडीने चालू करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
 
Top