काटी, दि.१२
काटी ता. तुळजापूर येथील व्यवसायिक तथा साळुंके टायर्सचे मालक दत्तु बाबुराव साळुंके वय 58 वर्ष यांचे मंगळवार रोजी राञी साडे दहा वाजता तुळजापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले. ते स्वातंत्र्य सैनिक कै.बाबुराव साळुंके यांचे सुपुत्र तर श्रीकांत साळुंके यांचे वडील होत.
त्यांच्या व्यवसायामुळे सर्वांच्या संपर्कातील एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व हरपल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी दुपारी एक वाजता तुळजापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्या पार्थिवावर काटी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुन, एक भाऊ,नातवंडे असा परिवार आहे.