उस्मानाबाद,दि.१२ : प्रसिद्ध सन ग्रुपचे प्रमुख,उस्मानाबाद रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख यांनी त्यांचे पिताश्री कै.बाजीराव व्यंकटराव देशमुख यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त शहरातील अन्नपुर्णा बहूउद्देशिय सामाजिक संस्थेस मंगळवार दि.11 मे रोजी विविध मान्यवरांचे उपस्थितीत 11 हजार रूपयेची अर्थिक मदतीचा धनादेश दिला.
आजच्या जागतिक महाभयंकर अशा महामारीच्या काळात अनेक छोटे मोटे व्यवसाय बंद पडले आहेत.
रूग्णालयात येणारे कोरोना रूग्ण तसेच बेरोजगारीने उपासमार होऊ नये म्हणून सामाजिक जाणिवेतुन व माणुसकीच्या दृष्टिने अमरसिंह देशमुख यांनी ही मदत केली आहे.
याप्रसंगी अमरसिंह देशमुख,अमोल भोसले,अतुल अजमेरा, नानासाहेब देशमुख, चेतन भोसले, मनोज कोचेटा तसेच अन्नपुर्णा संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
सन ग्रुप व देशमुख बंधु हे नेहमीच असे सामाजिक उत्तरदायीत्व पार पाडतात. त्याच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.