नळदुर्ग , दि. २२ : 
तुळजापूर तालुक्यातील मानमोडी येथील चिंचखोरी तांडा येथे डांबरीकरण कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत या  तांडायला जायला रस्ता नव्हता त्यामुळे येथील नागरिकांनी मागच्या खासदार, आणि आमदार, निवडणुकीच्या वेळी मतदानावर बहिष्कार टाकला होता. 

या मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी येथील  ग्रामस्थाची  गैरसोय पाहुन शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समिती कडून हा रस्ता मंजुर करून घेतला. त्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.


जिल्हा परिषद निवडणूकीच्या वेळी चव्हाण यांनी येथील ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. ते आश्र्वासन पुर्ण केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी  सरपंच गोपाळ सुरवसे, माजी सरपंच रुपचंद आडे, गोर सेनेचे तालुकाध्यक्ष राजु चव्हाण,किसन पवार , दिनेश राठोड,देविदास राठोड, सचीन कदम ,शाम राठोड,पुना चव्हाण, नामदेव चव्हाण, बालाजी राठोड, पिटुं थोरात, विनोद आडे आदि उपस्थित होते.


जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यानी मतदार संघात निवडणुकी दरम्यान येथिल रस्त्याचे काम पक्के करुन हा भाग शहरी भागाशी जोडण्याचे जनतेला दिलेल्या अश्वासनाची पुर्तता केल्याने त्यांचे सर्वञ आभिनंदन होत आहे.
 
Top