नळदुर्ग,दि.१५ विलास येडगे
स्वच्छ इंधन आणि स्वच्छ अन्न यावर धरणे बायोफ्युल प्रायव्हेट लिमिटेड काम करणार आहे, असे जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे प्रमुख सचिन धरणे यांनी प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना सांगितले.
मीरा क्लीनफ्युल लिमिटेडच्या सहाय्याने व धरणे बायोफ्युल प्रायव्हेट लिमिटेड तसेच पृथ्वी केअर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. दि.१४ मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रकल्पाचा शुभारंभ ऑनलाईन करण्यात आला. नळदुर्ग काँग्रेसचे नगरसेवक बसवराज धरणे यांच्या हस्ते या प्रकल्प उभारणीच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी या प्रकल्पाचे प्रमुख सचिन धरणे, प्रा. संतोष पवार, मुरमे आदीजण उपस्थित होते.
इटकळ ता.तुळजापुर परीसरात राष्ट्रीय महामार्गालगत हा प्रकल्प उभा राहत आहे.तुळजापुर तालुक्याच्या विकासाला बळ देणारा हा प्रकल्प आहे. प्रदुषणमुक्त भारत, सेंद्रिय शेती तसेच शेतकरी आर्थिक विकास आणि रोजगार यासारखे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प आहे. नगरसेवक बसवराज धरणे यांच्या हस्ते या प्रकल्प उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या प्रकल्पाविषयी माहिती देताना प्रकल्प प्रमुख सचिन धरणे यांनी म्हटले की,स्वच्छ इंधन व स्वच्छ अन्न यावर धरणे बायोफ्युल प्रायव्हेट लिमिटेड काम करणार आहे. पर्यावरण प्रदुषण व बेरोजगारी हे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. आपल्या देशात दरवर्षी केवळ पर्यावरण प्रदूषणामुळे लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे स्वच्छ इंधन तयार करून पर्यावरण प्रदुषणाला आळा घालण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्योजकता विकास हा कार्यक्रमही याठिकाणी राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचा विकास करण्याबरोबरच त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प तुळजापुर तालुक्याच्या विकासाला दिशा देणारा ठरणार आहे. आज आपल्या देशात कर्करोगाच्या रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर घर तिथे कर्क रुग्ण आढळतील याला आळा बसावा यासाठी सेंद्रिय शेती करून स्वच्छ अन्न निर्माण करण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातुन होणार असल्याचेही यावेळी सचिन धरणे यांनी म्हटले आहे.