नळदुर्ग,दि.३० :
 गुळहळ्ळी ता.तुळजापूर येथिल   माजी संरपंच हनुमंतराव विश्वनाथ पाटील वय ८८ वर्ष यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि.२९ मे रोजी सोलापूर येथिल रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी १वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मूले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी, दहिटणा व गुजनूर या ग्रुप ग्रामपंचायतीचे  सरपंच होण्याचा बहुमान  मिळविलेल्या व  गुळहळ्ळी गावचे सुपुत्र  हनुमंतराव विश्वनाथ पाटील  हे काही दिवसापासुन आजारी आसल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सु होते. ते भाजपचे कार्यकर्ते सचिन घोडके यांचे मामा होत. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली. व परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

 
Top