लोहारा,दि.२९:  
 शहरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून बाधित रुग्ण संख्या वाढत होती. सध्यस्थितीला कोरोनाचा वाढता आलेख कमी होत असून  कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ नये. याअनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते किरण गायकवाड व शिवसेना तालुका प्रमुख मोहनज पणुरे यांच्या सहकार्याने माजी नगरसेवक शाम नारायणकर व डॉ.सुवर्णमाला शाम नारायणकर यांच्या सहकार्याने  शुक्रवार  (दि.२८) रोजी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. 

 या फवारणीचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,मल्लिकार्जुन पाटिल,महेश बिराजदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top