उस्मानाबाद दि १० :
पांचाळ सोनार समाज सेवा संस्था , कालिका देवी समिती उस्मानाबाद व अखिल महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड १९ समज-गैरसमज या विषयावर डॉ.ज्ञानेश्वर पंडित विजयपूर (कर्नाटक ) यांनी झुम मिटींग द्वारे समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात काय काळजी घ्यावी? तसेच आपल्या स्वतःची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी? लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?डायबिटीज रूग्णांनी स्वतःची काळजी कशा प्रकारे करावी अशा विविध विषयावर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी समाज बांधवांच्या सर्व शंकांचे समाधान केले. तसेच कोरोना विषयी मनात असणारी भीती चांगल्या प्रकारे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पंडित (उस्मानाबाद) तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश पळसे (बारामती)यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात श्री संत नरहरी महाराजांचे अभंगानी प्रथमेश पोद्दार यांच्याकडून करण्यात आली. व कार्यक्रमाचे उद्घाटन अविनाश पंडित यांच्या हस्ते श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक दीक्षित व कार्यक्रमाचा समारोप सौ लता दीक्षित यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज पंडित व सौ .सविता पंडित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत वैरागकर ,संतोष सोनार ,महेश म्हेत्रे ,संतोष पंडित ,मुकेश पोद्दार, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक काटकर, समस्त पांचाळ सोनार समाज उस्मानाबाद. कालिका देवी महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.