तुळजापूर, दि. १० : डॉ. सतीश महामुनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या महाद्वार समोर कार्यकर्त्यांनी महाआरती करून तुळजाभवानी देवीस  लवकरात लवकर कोरोना आपत्ती मधून जनजीवन सुरळीत होण्याची शक्ती दे असे साकडे घातले, 

तुळजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या पक्षाच्या दराप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा करावी असे आवाहन या निमित्ताने पाटील यांनी केले.

कोरोना काळात आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर. नर्स, ब्रदर, सिस्टर, कर्मचारी, व कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करणारे नगर परिषदेचे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकजुटीने या आपत्तीच्या काळात उपजिल्हा रुग्णालयात रुग्णावर चांगले उपचार केल्याबद्दल गौरव उदगार काढले.
 

यावेळी माजी नगरसेवक धनंजय पाटील, दिलीप मगर,अशोक जाधव प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, शहराध्यक्ष अमर चोपदार, उपाध्यक्ष मकसूद शेख, कार्याध्यक्ष गोरख पवार, महेश चोपदार,अण्णा क्षीरसागर,गणेश नन्नवरे,सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष विनोद जाधव, अल्पसंख्यांक माजी  तालुकाध्यक्ष तोफीक शेख,युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, विवेक शिंदे,जिल्हा सरचिटणीस शशी नवले,तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, कार्याध्यक्ष शरद जगदाळे, शहर अध्यक्ष नितीन रोचकरी, कार्याध्यक्ष बाळासाहेब पेंदे, अनमोल शिंदे,उपाध्यक्ष वैभव शिंदे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष रोहित चव्हाण,समर्थ पैलवान, मनोज माडजे,समाधान धाकतोडे आदी उपस्थित होते. 


यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते गणेश नन्नवरे व अल्पसंख्यांक आघाडीचे नेते तोफिक शेख यांनी पक्षामध्ये नवीन नेतृत्वाला काम करण्याची चांगली संधी दिली जाते, त्यामुळे युवक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत असल्याचे सांगितले.



 
Top