उस्मानाबाद, दि. 11 :
उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 11 जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 123 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर आज 1 रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर मागील काही दिवसातील 6 मृत रूग्णांची नोंद आज घेण्यात आली. तसेच आज दिवसभरात 232 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 56 हजार 615 इतकी झाली आहे. यातील 54 हजार 360 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 309 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 946 जणांवर उपचार सुरु आहेत.