उस्मानाबाद,दि.११ :
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): माधुरी खंडु सुरवसे, रा. जहागीरदारवाडी, ता. उस्मानाबाद यांना दि. 09 जून रोजी 16.00 वा. सु. राहत्या घरासमोर त्यांचा दिर- विकास चंदर सुरवसे यांनी घराच्या मालकीहक्काच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने मारहान केली. तसेच माधुरी यांसह त्यांचे पती- खंडु यांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या माधुरी सुरवसे यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): उस्मानाबाद शहरातील ‘आर्या हॉटेल’ मध्ये ग्राहक- काशीनाथ साळुंखे व प्रभु साळुंखे, दोघे रा. वडारगल्ली, उस्मानाबाद यांनी जेवण केल्यानंतर हॉटेल मालक- बालाजी वगरे यांनी त्यांस जेवणाचे पैसे मागीतले. यावर नमूद दोघांनी जेवणाचे पैसे देण्यास नकार देउन अन्य सात जणांच्या सहायाने बालाजी वगरे यांसह हॉटेलमधील त्यांचे नातेवाईक- प्रशांत पानसरे, पांडुरंग वगरे, नरसिंह मेटकरी अशा चौघांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, विटा, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच हॉटेल मधील साहित्याची व अन्य ग्राहकांच्या दुचाकीचे तोडफोड करुन नुकसान केले. अशा मजकुराच्या बालाजी वगरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.