उस्मानाबाद,दि.१२:
कळंब तालुक्यातील खोंदला पाटी ते मांजरा नदी रोडचे लोकार्पण सोहळा खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास घाडगे-पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, युवासेना राज्य विस्तारक व युवासेना संपर्क प्रमुख नितिन लांडगे आदींच्या हस्ते संपन्न झाला.
कळंब तालुक्यातील मागील पंचवीस वर्षे प्रलंबित असलेल्या खोंदला पाटी ते मांजर नदी रोडची खूप मोठी दुरावस्था झाली होती. गावातील व परिसरातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. गावातील नागरिकांनी वारंवार आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागा अंतर्गत 3054 मधुन हा साडे तीन कि.मी लांबीचा रस्ता मंजूर करून त्या रस्त्याचे काम करून घेतले आहे.
यामुळे ग्रामस्थांना सिमेंट रस्त्यावरून प्रवास करता येणार आहे. ग्रामस्थांची खुप दिवसापासूनची इच्छा पूर्ती झाली आहे. सरकारने आपले हक्काचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आपले स्वप्न पूर्ण केले आहे. लवकरच शासकीय महाविद्यालय आपल्या सेवेत रुजू होणार असल्याचे खासदार निंबाळकर यानी संगितले.
शासकीय सामान्य रुग्णालय येथे तीन मजली इमारत बांधुन उभा होती. मात्र फर्निचर, लिफ्ट, फायरफाईट काम अपुर्ण असल्यामुळे इमारत वापरात नव्हती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या निधीतून निधी उपलब्ध करू दिला त्यामुळे कोरोना काळात 450 ऑक्सीजन बेडचे राज्यात एकमेव सामान्य रुग्णालय ठरले. याचा फायदा कोरोना काळात रुग्णांना उपचार घेण्यास ठरला. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे , व राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे त्यानी आभार मानले.
यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूकी मध्ये आम्ही मत विकासावर मागू केवळ आश्वासन देऊन नाही. अशी ग्वाही दिली.
गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले आहेत. कंपनीने 72 तासात ऑनलाईन तक्रारीची अट पुढे करुन विमा देण्यास नकार देत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी यांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा केली आहे.
शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेऊन न्यायालयात विमा कंपन्याविरोधात दावा दाखल केला आहे. पिक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जि.प.सदस्य बालाजी जाधवर, शिवसेना शहरप्रमुख प्रदिप मेटे, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे युवासेना विधानसभा अध्यक्ष सचिन काळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, निळकंठ मुळीक, माजी सरपंच माऊली मुळीक , सरपंच निवृत्ती पवार, उपसरपंच बंडू मुळीक, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड.मंदार मुळीक, तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश लांडगे , ग्रा.पं. सदस्य बिभीषण कांबळे, बाळासाहेब मुळीक, भास्कर लांडगे, बापूराव लांडगे, नारायण लांडगे, शिवकुमार लांडगे, महादेव लांडगे, आसाराम मुळीक, मधुकर लांडगे, शिवाजी लांडगे, रामराव लांडगे, विठ्ठलराव मुळीक, मुरलीधर लांडगे, आबासाहेब मुळीक, धनंजय लांडगे, गोविंद मुळीक, सुनील मुळीक, श्रीराम लांडगे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.