जळकोट,दि.१२ ,मेघराज किलजे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून व बँक आपल्या दारी उपक्रमांतर्गत जळकोट ता . तुळजापूर येथे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्यावतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या वतीने गावातील निराधार महिला व पुरुषांना घरोघरी जाऊन अनुदानाचे वाटप करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या अंतर्गत खाते असलेल्या निराधारांना त्यांच्या घरी जाऊन अनुदानाचे वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
त्याचबरोबर बँक आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम, उपसरपंचपती बसवराज कवठे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, गणेश कृषी विज्ञान मंडळ ,कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सेक्रेटरी राजशेखर माळगे, शेषेराव वाघमारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी रमाकांत माने, संगणक परिचर भगतसिंग ठाकूर, राजू चिमुकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.