अचलेर , दि.१२ :
लोहारा तालुक्यातील अचलेर भीमनगरचे सुपुत्र माने दत्ता नामदेव यांची तालुका कृषी अधिकारी कार्यालय दौंड येथे पदोन्नतीने कृषी पर्यवेक्षकपदी पदोन्नती झाली आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण अचलेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर दहावी पर्यंत चे शिक्षण विद्या विकास हायस्कूल अचलेर येथे झाले बारावी आर.पी. कॉलेज उस्मानाबाद येथे झाल्यानंतर बी.एस.सी.अँग्री मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नाशिक विभागात धडगाव जिल्हा नंदूरबार येथे सन १९९६ साली कृषी सहाय्यक पदावर नियुक्त झाली.
त्यानंतर संभागिय बदली करून पुणे जिल्ह्यात काम केले.
तदनंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय दौंड येथे पदोन्नतीने कृषी पर्यवेक्षक पदी पदोन्नती झाली आहे.
या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे आभिनंदन होत आहे.