तुळजापूर, दि. १२: डॉ. सतीश महामुनी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दि. १३ जून रोजी होणारा ८५ वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी सर्वत्र कोरोना आपत्तीच्या संसर्गाची भीती अद्याप असल्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, नातेवाईक, समर्थक आणि मित्र परिवार यांनी आपल्या घरामध्ये राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात , त्याचा मी स्वीकार करीत आहे . तसेच या आपत्तीच्या काळामध्ये सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन केले आहे.