किलज,दि.१२ : 
तुळजापूर तालुक्यातील किलज येथील विद्युत पुरवठा विभागाचे  अशोक शेळके यांना सन २०२०-२१ सालामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभाग तुळजापूर यांच्या वतीने शेळके यांना "उत्कृष्ठ थकबाकी वसुली केल्याबद्दल " तसेच सर्वच क्षेत्रात विद्युत ग्राहक व कंपनी यांच्यासाठी केलेल्या उल्लेखनीय  कामगिरी बदल त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. अशोक शेळके हे गावातील विद्युत क्षेत्रातील तसेच सर्व सामाजिक क्षेत्रातील अडीअडचणी मध्ये धावून येत असतात. त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरी बदल महावितरण विभाग तुळजापूर आणि ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा गौरव केला जात आहे.
 
Top