उस्मानाबाद, दि. 02 : उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार दि. 2 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसारप्राप्त 340 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 352 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 55 हजार 376 इतकी झाली आहे. यातील 51 हजार 624 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 256 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 496 जणांवर उपचार सुरु आहेत.








 
Top