पोलीस ठाणे, तामलवाडी: राजेश व मयुरेश रविराज भोकरे, दोघे रा. नांदुरी, ता. तुळजापूर हे दोघे भाऊ दि. 31 मे रोजी 17.30 वा. सु. नांदुरी गट क्र. 107 मधील शेताची मशागत करत होते. यावेळी भाऊबंद- 1)सुरज सुरेश भोकरे 2)स्वस्तिक सुरेश भोकरे 3)सुरेश भोकरे 4)लक्ष्मी भोकरे यांसह गावकरी- ऋषिकेश मुळे अशा पाच जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून मशागत आडवून ट्रॅक्टरची चावी जबरीने काढून घेतली. तसेच शेतजमीन मोजणीच्या कारणावरुन राजेश व मयुरेश या दोघा भावांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राजेश भोकरे यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 144, 147, 148, 149, 326, 327, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: सुभाष चौगुले, रा. नांदगाव, ता. तुळजापूर हे मुलगा- शरणाप्पा यांसह दि. 30 मे रोजी 16.00 वा. सु. नांदगाव गट क्र. 538 मधील शेतात पेरणी करत होते. यावेळी शेतजमीन मालकीच्या कारणावरुन गावकरी- नागेंद्र मारुती गुरव यांनी नमूद दोघा पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शरणाप्पा चौगुले यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.