उस्मानाबाद,दि.२
वाशी: चालक- यशवंत बाबासाहेब गवळी, रा. पारा. ता. वाशी यांनी दि. 11.05.2021 रोजी 18.30 वा. सु. पारा येथील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 20 एफव्ही 4218 ही निष्काळजीपणे, भरधावर वेगात चालवून गावकरी- रामकिसन बाबुराव भराटे हे चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडक दिल्याने रामकिसन भराटे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- राजेंद्र बाबुराव भराटे यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, मुरुम: रंगराव बब्रुवान जामगे, वय 50 वर्षे, रा. कोराळ, ता. उमरगा हे दि. 30.05.2021 रोजी 17.45 वा. सु. गावातील रस्त्याने पायी जात होते. यावेळी गावकरी- फलचंद बब्रुवान जामगे यांनी महिंद्रा मेक्सीको वाहन क्र. एम.एच. 25 आर 5928 ही निष्काळजीपणे चालवून रंगराव जामगे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन शेंडगे हॉस्पीटल, उमरगा येथे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- विठ्ठल रंगराव जामगे यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे