उस्मानाबाद,दि.२ : 

एक 35 वर्षीय विवाहीत महिला  (नाव- गाव गोपनीय) दि. 31 मे रोजी 20.00 वा. सु. शौचास गेली असता गावातीलच एका पुरुषाने तेथे जाउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडला प्रकार अन्य कोणास सांगीतल्यास तीला व तीच्या कुटूंबीयांना ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

अपहरण.

उस्मानाबाद जिल्हा: एका तरुणाने गावातीलच एका 15 वर्षीय मुलीस फुस लाउन (नाव- गाव गोपनीय) दि. 30.05.2021 रोजी 18.30 वा.सु. तीच्या राहत्या घरुन तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top