नळदुर्ग, दि.३ :
नळदुर्ग-तुळजापुर महामार्गावर चिवरी पाटी, हगलूर पाटी आदि ठिकाणी अनावश्यक गतिरोधक केलेले तात्काळ हटविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  करण्यात आली आहे.

नळदुर्ग  - तुळजापूर  मार्गावर  गतीरोधक केलेला  हा परिसर बहुतांश वेळी निर्मनुष्य असतो,या ठिकाणी गतिरोधकची कसलीही गरज अथवा मागणी नसताना व रात्रीच्या वेळी लूटमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही., या परिस्थितिची कल्पना असताना हे गतिरोधक का केले ? व तसेच या ठिकाणी गतिरोधकमुळे लुटमारीची घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न मनसेने उपस्थित करून, तुळजापुर-नळदुर्ग-अक्कलकोट महामार्ग,सोलापुर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना येत्या आठवडाभरात हे गतिरोधक हटवावे अन्यथा मनसे स्टाइलने आम्ही ते हटवू असे निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.


निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष आलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांनी स्वाक्षरी केली आहे.
 
Top