तुळजापूर,दि.३
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे नोकरीतील पदोन्नतीचे आरक्षण सत्ताधारी आघाडी सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)च्या वतीने तुळजापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या वतीने निवेदनात म्हटले आहे की, पदोन्नती मध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे.सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने ७ मे २०२१ रोजी जी.आर काढून त्याला स्थगिती दिली आहे. हा मागासवर्गीय कर्मचा-यावर अन्याय आहे. सदरचा जी.आर रद्द करुन पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित घेण्याची मागणी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागु केलेल्या सर्व नियमाचे पालन करित तुळजापूर तहसील कार्यालय येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, शहराधक्ष आरूण कदम, युवा आघाडी शहराध्यक्ष अमोल कदम, अरूण कदम, बीआरएसपी अध्यक्ष वैजनाथ पांडागळे, आप्पा कदम, तानाजी कदम ,अतिश कदम,अनिकेत सोनवणे, राहुल सोनावणे, अंकुश माने, प्रताप कदम, अजय चौधरी, महादेव सोनवणे, राम सोनवणे, राज कदम, तानाजी डावरे,आत्माराम सोनावणे, सोनु कदम आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.