उस्मानाबाद ,दि. ३० :
एकल महिला संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी बुधवार दि.३० जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ताट ,वाटी आंदोलन करण्यात आले. आले. महिलानी मोर्चा काढून जिल्हाधिकारी याना निवेदन दिले.
एकल महिला संघटना गेल्या 5 वर्षा पासून उस्मानाबाद जिल्ह्यातील 83 गावात महिलांच्या प्रश्नावर काम करते. पुढील मागण्यासाठी बुधवारी मोर्चा काढण्यात आला .
वाढती महागाई कमी करण्यात यावी,
घरेलू कामगार महिलांची घरेलू कामगार महिला म्हणून रितसर नोंदणी झाली पाहिजे , एकल महिलांची पेन्शनचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, भाजी विकणार्यांना भाजी ओटा तयार करून देण्यात यावा, वरवंटी गावात महामंडळची बस सुरू व्हावी,
यामोर्चासाठी उस्मानाबाद तालुका अध्यक्ष प्रतिभा मेटे तालुका सचिव कांता शिंदे व लक्ष्मी वाघमारे,महानंदा चव्हाण,अनिता नवले,आश्विनी शेळके,अनुसया सरवदे सुरेखा भोसले व सर्व महिला प्रतीनिधीनी पुढाकार घेऊन बुधवार दि.३० जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले..