काटी दि.३०
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत काळे नियत वयोमाना नुसार जून अखेर सेवानिवृत्त झाले. या सेवा निवृत्ती निमित्त येथील शिक्षक वृंदानी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.
तुळजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांच्या शुभ हस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, उपसरपंच गौरीशंकर नकाते यांच्या उपस्थितीत चंद्रकांत काळे यांचा सपत्नीक सत्कार केले. याप्रसंगी कोवीडचे सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी काटी केंद्राचे केंद्र प्रमुख संजय सोलनकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
सुरूवातीला गट शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सत्कार करण्यात आला. या वेळी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात सेवानिवृत्त मुख्याध्यापक काळे यांनी सेवा कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक करुन उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी बापू काळे , कांचन काशिद यांनी मनोगत व्यक्त केले .प्रास्ताविक विठ्ठल निचळ तर उपस्थितांचे आभार हरिश्चंद्र खेंदाड यांनी मानले.
या वेळी हरिश्चंद्र खेंदाड, सुधीर जाधव , मनीषा एखंडे, वंदना आलमद , श्रीकांत राक्षे, कांचन काशिद , प्राजत्का लालबोंद्रे, विष्णू ताटे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या अंजना ताटे, इत्यादी उपस्थित होते.