तुळजापूर दि ३० :
तुळजापूर पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील सामाजिक संस्थेच्या तिने त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कोरोना आपत्कालीन परिस्थिती बाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि त्याचे परिणाम या संदर्भातील याप्रसंगी अनौपचारिक चर्चा करण्यात आली. रुग्णसेवा समितीचे सदस्य आनंद कंदले यांनी या अनुषंगाने उपस्थितासोबत चर्चा केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोटे , उपनिरीक्षक चव्हाण , रत्नदिप भोसले, अनिल पवार उपस्थित होते.