अणदूर , दि. २९ 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शिवा डिजिटल मध्ये मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्र सुरु झाले आहे ई गव्हर्नर सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड मिनिस्ट्री ऑफ इलेकट्रोनिकक्स ऍड इन्फर्मेशन टेक्नोलोंजि ऑफ इंडिया न्यू दिल्ली मार्फत विभाग भारत सरकार यांच्या मार्फत आता ग्रामिण भागात कायदेविषयक मोफत सल्ला सर्वजण घेऊ शकतात.

 तुळजापूर तालुकामध्ये अणदूर येथील शिवा डिजिटल नागरिक सेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर येथे २९ जुन पासून शुभारंभ करण्यात आला आहे व गावक -यांकडून  या सुविधेचा लाभ घेतला जात आहे.  विविध विषयावर योग्य कायदेशीर मार्गदर्शन सल्ला नागरिकांना व्हिडिओ कॉलद्वारे उपलब्ध झाल्याने विविध समस्या गामीण भागातील दूर होणार आहेत. याच ठिकाणी आपले सरकार  सेंटर असल्याने गावातील शेतकऱ्यांना  मोठी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे.
 
Top