नळदुर्ग, दि. २९ :

 आपली बँक आपल्या गावी
मौजे गुळहळ्ळी ता. तुळजापूर  येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नळदुर्ग यांच्या वतीने पीक कर्ज नवे जुने  करण्याचे शिबिर गुळहळ्ळीचे  सरपंच सौ मिरा सचिन घोडके यांच्या अध्यक्षतेखाली व बँकेचे
व्यवस्थापक  निर्माण पारकर , क्षेत्रीय अधिकारी सुखविंदर सिंग , सौ मेघना तेंडुलकर , निळकंठ राठोड
यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. यावेळी गुळहळ्ळी गावातील ज्या शेतकऱ्यानी  2018-2019 -  2019-2020 या आर्थिक वर्षी पिक कर्ज घेतले आहे त्यांना त्यांचे 
पिक कर्ज नवे-जुने करणे, पिककर्ज वाढवून देणे, पिक कर्ज शासनाच्या नवीन धोरणा नुसार  शुन्य टक्के  व्याज दरात वर्ग करणे, अटल पेन्शन, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढणे अशाप्रकारे सर्व जनतेशी व शेतक-याशी निगडीत  काम या शिबिरात करण्यात आले.  यावेळी ग्रामसेवक एम सी निलगार ,उपसरपंच खाजाबी पटेल , ग्रामपंचायतचे सदस्य, गावातील सर्व शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 गुळहळ्ळी येथे 2019-2020 या आर्थिक वर्षी 1 कोटी 47 लाख रुपये पिक कर्जाच्या रुपात वाटप केले होते .  त्या सर्व शेतकऱ्यांना या शिबिराचा फायदा होणार आहे. सदरील शिबिरात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप  करण्यात आले.

 हे शिबीरामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानून समाधान व्यक्त  केले. सदरील शिबीर हे भाजपा युवा मोर्चा  जिल्हा सरचिटणीस सचिन घोडके यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुंडू पटेल यांनी तर अरविंद पाटिल यांनी आभार मानले.
 
Top