उस्मानाबाद ,दि.१०
पोलीस ठाणे, भुम: ग्रामीण रुग्णालय, भुम येथे उपचारार्थ असलेल्या सुबाबाई काशीनाथ माने, वय 65 वर्षे यांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दि. 08 जून रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद येथे रेफर केले होते. परंतु सुबाबाई यांचे नातू- नाना अंकुश माने, रा. भुम यांनी तेथे येउन, “तुम्ही आमचे पेशंट आजीस मारता काय, मी तुम्हाला कोयत्याने कापतो?” असे वैद्यकीय अधिकारी- डॉ. आदर्श बालाजीराव दासरे यांना धमकावून धक्काबुक्की केली व रुग्णालयातील सहकारी डॉ. भगवान गोपाळघरे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे नाना माने याने लोकसेवकाच्या शासकीय कर्तत्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन डॉ. आदर्श दासरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.