पोलीस ठाणे, तुळजापूर: उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे उपचार घेत असलेले कोविडचे आंतररुग्ण ज्ञानदेव शिवाप्पा गायकवाड, वय 60 वर्षे, रा. वानेगांव, ता. तुळजापूर हे दि. 08 जून रोजी 13.30 वा. वैद्यकीय पथकास काहीही न सांगता रुग्णालयातून परस्पर निघून गेले. अशा प्रकारे त्यांनी कोरोना संसर्गाची शक्यता निर्माण होईल अशी निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन वैद्यकीय अधिकारी- श्री. सतिश आंबुरे यांनी दि. 09 जून रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.