तुळजापूर, दि. १४: डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी वैभव अंधारे यांची सर्वानुमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुळजापूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेची बैठक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तुळजापूर नगरपरिषद प्रशासकीय संवर्ग कर्मचारी संघटना अध्यक्षपदी वैभव अंधारे यांची निवड झाल्यामुळे सदर बैठकीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारणी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या सचिवपदी ज्ञानेश्वर टिंगरे, सहसचिवपदी नागेश श्रीराम काळे, कोषाध्यक्षपदी शिवरत्न अतकरे, सल्लागार महादेव सोनार व प्रशांत चव्हाण, संघटक जमुना श्यामवाळा व विमल चिमाजी साळुंखे, प्रसिद्धीप्रमुख सज्जन गायकवाड, मार्गदर्शक अशोक सनगले, अभंग गायकवाड,संस्कृतीक विभाग प्रमोद भोजने, कार्यकारणी सदस्यपदी नंदू क्षिरसागर, गुणवंत कदम,राहुल मिटकरी, अंबादास माळवदकर, दत्ता कसबे, शोभा कांबळे रमेश साळुंखे, महादु शिंदे यांची निवड करण्यात आली.