तुळजापूर, दि. १४ :

तुळजाभवानी मंदिर बंद असल्यामुळे तुळजापुरात मंदिरावर उदरनिर्वाह असणाऱ्या सर्वच घटकांची मोठी तारांबळ सुरू आहे.  यामध्ये अत्यंत गरीब लोकांची दोन वेळचे जेवण करण्यासाठी  सुरु असणारी तारांबळ,  या अडचणीच्या काळात अधिक तीव्र बनली आहे , 

याविषयी सामाजिक बांधिलकी ठेवून  येथील  पुजारी विजय बोधले आणि श्री क्षेत्र विशाल भांजी या तरुणांनी आपल्या परीने अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे.

तुळजापूर येथे देवी भक्तांकडून दिलेल्या देणगीतून गरीब निराधार लोकांना पुजारी  विजय बोधले आणि पुजारी विशाल भांजी यांच्या मार्फत दररोज अन्नदान केले जात आहे. गरीब आणि तळागाळातील गरजू लोकांना या अनुदानाचा उपयोग होत आहे. या अडचणीच्या काळात या दोन पुजारी तरुणांनी गरजू लोकांना केलेली ही मदत गरीबाना दिलासा देणारी आहे. तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने या दोन तरुणांची विशेष कौतुक करण्यात आले.
 
Top