नळदुर्ग, दि. 05 :
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तुळजापूर तालुक्यतील सलगरा मड्डी शाखेच्यावतीने बोरगाव येथील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या 42 निराधार लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार प्रमाणे 84 हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील निराधार अनुदान, संजय गांधी निराधार अनुदान माहे एप्रिल व मे-2021 या दोन महिन्यांचे प्रत्येक लाभार्थ्यांना रक्कम रु.2000 (दोन हजार रुपये मात्र) आज दि. 5 जून रोजी बोरगाव येथे प्रत्यक्ष जाऊन बँकेचे कर्मचारी शाखाधिकारी आशीष जगदाळे, शाखातपासणीस तुळशीराम गडकर सेवक बालाजी सुरवसे व येथील सोसायटीचे चेअरमन अप्पाराव मुळे , शेषेराव वाघमारे, बसवंत मुळे , राउफ सय्यद यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 5 जून रोजी वाटप करण्यात आले.
शाखा- सलगरा मड्डी अंतर्गत गावोगावी जाऊन निराधार वाटप करण्यात येत आहे.जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार सुनिल चव्हाण साहेब संचालक मंडळ व कार्यकारी संचालक विजय घोणसे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली बँक आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येत आहे.