काटी,दि.५ :
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळेत जागतिक पर्यावरण दिना निमित्त शालेय परिसरात शिक्षकानी स्वखर्चाने रोपे आणून मुख्याध्यापक चंद्रकांत काळे यांच्या हस्ते सामाजिक अंतर राखत वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संतुलन राखून आपले सामाजिक आरोग्य कसे सुधारता येते यासाठी वृक्षारोपन ही राष्ट्रीय चळवळ व्हावी अशी माहिती प्रास्ताविकात सहशिक्षक बापू काळे यांनी यांनी सांगितली. त्यानंतर प्रतिशिक्षक तीन झाडे या प्रमाणे वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वड, बदाम,जांभूळ, लिंब, आंबा, गुलमोहर, चिंच, रामफळ,आदी एकूण ३० वृक्षांची लागवड करण्यात आली.
तसेच या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर हरिश्चंद्र खेंदाड यांनी तयार केलेली गुळवेळ या औषधी वनस्पतींची रोपे शिक्षक वृंदाना लागवडीसाठी मुख्याध्यापक चंद्रकांत काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
शेवटी विठ्ठल निचळ यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी , हरिशंद्र खेंदाड ,सुधीर जाधव , मनीषा एखंडे, श्रीकांत राक्षे, वंदना आलमद, बापू काळे, विठ्ठल निचळ,कांचन काशिद ,प्राजक्ता लालबोंद्रे ,विष्णू ताटे आदि शिक्षक वृंद उपस्थित होते.