तुळजापूर, दि. ५ :डॉ. सतीश महामुनी
वादळी पावसात तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे मोठे नुकसान होवुन संबधिताचे कुटूंब उघड्यावर आले. याबाबतची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिका-यानी नुकसानग्रस्त कुंटूबास धीर देवुन रोख रक्कम , व जीवनावश्यक साहित्य दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पालकमंञी शंकर गडाख , संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या वतीने बारूळ ता. तुळजापूर येथील रहिवासी सुरेश कोळी व यासीन पठाण यांच्या घराचे वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले.
या आपत्तीची माहिती सोशल मिडीया विभागप्रमुख सिद्राम कारभारी यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना देऊन मदतीची विनंती केली,
याची तात्काळ दखल घेऊन शिवसेनेच्या पदाधिका-यानी त्यांना यांनी रोख रक्कम स्वरूपात २० हजार रूपये , किराणा साहित्य याची मदत केली आहे . अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना मदत केल्यानंतर सदर कुटुंबीयांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क करून सर्व कार्यकर्त्यांच्या समोर त्यांचे आभार मानले.
यावेळी तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, बाजार समिती उपसभापती संजय भोसले, शिवसेना उपतालुका प्रमुख रोहित नागनाथ चव्हाण,शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,काक्रंबा विभागप्रमुख दगडू शिंदे,बालाजी पांचाळ, शंकर गव्हाणे, सोशल मिडीया विभागप्रमुख सिद्राम कारभारी,उपसरपंच नबिलाल शेख, शाखाप्रमुख अंकुश नवगिरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.