लोहारा, दि. २२
शहरातील लोहारा नगर पंचायतच्या माजी नगरसेविका जयश्री उत्तम कांबळे वय ६५ वर्ष , यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान उस्मानाबाद येथे मंगळवारी दि.२२ जुन रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लोहारा येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी प्रवीण कांबळे यांच्या आई होत.