कळंब , दि. २१ :
एका पोलिस आधिका-याच्या घरात घुसुन ४ ते ५ चोरट्यानी त्या पोलिस आधिका-याच्या आई - वडिलाचे हातपाय बांधून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे साडे तीन लाखाच्या ऐवज चोरुन पसार झाल्याने सर्वञ खळबळ उडाली आहे. ही घटना दि. २० जुन रोजी पाहटे पुर्वी घडली. दरम्यान पोलिसानी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव ता. कळंब येथील रहिवाशी असणारे पोलिस निरीक्षक एम. डी. अंकुसे यांच्या घरातून चोरट्यांनी ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. अकुंसे हे सध्या नांदेड येथे कार्यरत आहेत. हावरगाव येथिल घरात त्यांचे आई-वडील राहतात. दरम्यान ४ ते ५ चोरट्यांनी अंकुसे यांच्या घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करून पोलिस निरीक्षकांचे वडील देविदास लिंबाजी अंकुसे व त्यांची आई विमल अंकुसे यांचे हात-पाय बांधले. चोरट्यानी कपाटाच्या चाव्या घेऊन ३० हजार रुपये व साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, असे मिळुन ३ लाख ५० हजार रुपयेचा मुद्देमाल चोरला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, साहय्यक पोलिस निरीक्षक अतुल पाटील व पोलिस कर्मचा-यानी तातडीने भेट देवुन पाहणी केली. दरम्यान घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले .
श्वानाने कळंब तालुक्यातील वाकडी येथील पारधी वस्तीपर्यंत माग काढला. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.