प्रतिकात्मक फोटो


वाशी ,दि.२१:
स्वयंपाकघरात गँसचा भडका उडुन झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एका तरुणीचा मृत्यु झाल्याची घटना उस्मानाबाद जिल्यातील  वाशी शहरात सोमवारी दुपारी घडली.

वाशी शहरातील गुमटाचा फड या भागातील सारिका सदाशिव क्षीरसागर वय २० वर्ष  ही तरुणी सोमवारी  दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान स्वयंपाक घरामध्ये गॅसवरील काम करण्यासाठी गेली होती. परंतु गॅसची आधीपासूनच गळती  झाल्यामुळे घरात  गॅसने संपूर्ण स्वयंपाक घरामध्ये पेट घेतला.  या घटनेत सारिकाचा होरपळून मृत्यू झाला. 

सदरील घटनेवेळी शेजाऱ्यांना घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने ते मदतीला धावून गेले. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होण्यापासून वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी वाशी पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणुन नोंद करण्यात आली  आहे. पुढील तपास साहय्यक  पोलिस  निरीक्षक  संजीव निरगुडे करत आहेत. या घनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top