तुळजापूर ,दि.२१ :
तुळजापूर:- तुळजापूर येथील जेष्ठ नागरिक विजयराव शिवाजीराव कदम(मलबा) वय (76) यांचे मंगळवार दि. 22 रोजी तुळजापूर येथील खासगी रुग्णालयात दुपारी एक वाजता अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता येथील वरदायिनी प्रशालेजवळील कदम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.ते माजी तालुका सरचिटणीस व तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य विकास मलबा यांचे वडिल होत.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन सूना ,चार नातवंडे असा परिवार आहे .