भुम,दि.३ :
पोलीस ठाणे, भुम: देवळाली, ता. भुम येथील बजरंग बिभिषन तांबे, वय 39 वर्षे हे बेपत्ता असल्यावरुन भुम पो.ठा. येथे 3 / 2021 ही मिसिंग दि. 22.05.2021 रोजी नोंद असुन पोलीस त्यांचा शोध घेत होते.
तपासादरम्यान दि. 02.06.2021 रोजी 11.30 वा. आरसोली शिवारातील शेतात बजरंग तांबे यांचा मृतदेह पोलीसांना आढळुन आला. याप्रकरणी मयताची आई- हिराबाई बिभीषन तांबे, रा. देवळाली यांनी लेखी निवेदन दिले की, “ओमकार गौतम चव्हाण, रा. देवळाली याने पुर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरुन बजरंग तांबे यास जिवे ठार मारुन त्याचा मृतदेह एका पोत्यात बांधुन टाकला आहे.” यावरुन भुम पो.ठा. येथे ओमकार चव्हाण याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत गुन्हा भुम पो.ठा. येथे नोंदवला आहे.