कळंब,दि.३
पोलीस ठाणे, कळंब: विष्णु तुकाराम कोल्हे, रा. हावरगांव, ता. कळंब यांच्या हावरगांव गट क्र. 82 मधील शेतातील जलसिंचन पंपाचे साहित्य सोलार पॅनल, सोलार पाटी, स्टार्टर असे साहित्य दि. 31.05.2021 ते 01.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विष्णु कोल्हे यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत दिलीप पांडुरंग गंभीरे, रा. ईटकुर, ता. कळंब यांनी त्यांच्या ताब्याती बजान डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम.एच. 20 डब्ल्यु 5477 ही दि. 27.05.2021 रोजी 21.00 वा. सु. गावातील जगदंबा बिअर बार समोरल लावली होती. दुसऱ्या दिवशी ती त्यांना लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली असावी. अशा मजकुराच्या दिलीप गंभिरे यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.