लोहारा,दि.१४:  
माणुसकी जपत समाज कार्याबरोबरच पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्षरोपण व संगोपन  काळाची गरज असल्याचे प्रतिपादन निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांनी लोहारा पोलीस ठाण्यात शांतिदुत प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोंनाच्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा सन्मान व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी काढले.

 पर्यावरणा सह सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना सारख्या महामारीत देखील रक्तदाना सह आदी सामाजिक कार्य करणाऱ्या शांतिदुत सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून लोहारा येथील पोलीस ठाण्याच्या भव्य परिसरात  मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
     लोहारा पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचें अध्यक्ष म्हणून निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्यचे डॉ विठ्ठलराव जाधव हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर शांतिदुत प्रतिष्ठान च्या माध्यमातून पर्यावरणासह विविध सामाजिक क्षेत्रात अविरत अखंड सेवा करीत असलेले शांतिदुतचे संस्थापक अध्यक्ष सौ विद्याताई जाधव,तर तहसीलदार संतोष रुईकर, पोलीस निरीक्षक धरमसिह चव्हाण, सौ ललिता चव्हाण, शांतिदुतचें मराठवाडा अध्यक्ष जीवन जाधव, जिल्हाध्यक्ष ईश्वर मुगळे,  विक्रम पाचंगे, प्रताप घोडके, दयानंद गिरी, अस्लम शेख, हाजी हारुन खानापुरे,प्रशांत काळे,रंजना हासुरे, सह आदी मान्यवर  उपस्थित होते.

      पुढे बोलताना डॉ जाधव म्हणाले कि शांतिदुत प्रतिष्ठान च्या माध्यमातून पर्यावरणा बरोबरच सामाजिक हित जोपासत आपण समाजाचे काही तरी देणे आहोत हि विचारधारा मनामध्ये रुजवून समाजकार्य करीत आहोत कोरोनाच्या संकट काळात देखील रक्तदान सह आदी विशेष कार्य करीत समाजाप्रती मदतीचे कार्य केले जात आहे त्याच बरोबर शैक्षणिक  क्षेत्रात ही या संस्थेच्या माध्यमातून कामे केली जात असल्याचे सांगितले या प्रसंगी तहसीलदार संतोष रुईकर, शांतिदुतचे मराठवाडाध्यक्ष जीवन जाधव, समाजसेवक बाबा जाफरी, विक्रम पाचंगे, सह आदींनी मनोगत व्यक्त केले
 प्रथमता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव  हे निवृत्त झाल्यानंतर प्रथमच लोहारा येथे आल्याने व त्याच बरोबर कोरोनाच्या संकट काळात  आयसोलेशन उभारणी सह आदी सामाजिक कार्य करणारे समाजसेवक बाबा जाफरी उमरगा, सुनील सांळुखे,सालेगांव,किशोर साठे माकणी सह आदींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आले.
 त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे तसेच राजकीय जेष्ठ नागरीक पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्थाविक सुत्रसंचलन व आभार लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी केले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोहारा पोलीस ठाण्याचे एस एस पांचाळ, प्रवीण नळेगावकर, अनिल बोडमवाड,मनोज जगताप, बिलाल गवंडी, जावेद जेवळे, पिंटू शेगजे सह आदींनी परिश्रम घेतले.
 
Top