उसमानाबाद,दि.१४:
पोलीस ठाणे, ढोकी: अविनाश वाघमोडे व तानाजी लोमटे या दोन शेतकऱ्यांच्या कावळेवाडी येथील शेतातील तुषारसिंचन साहित्य दि. 16- 17.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याने ढोकी. पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
तपासादरम्यान ढोकी पो.ठा. च्या पथकाने 1)विलास ईश्वर काळे, रा. पारधी पिढी, ढोकी 2)गणेश गुरुनाथ कावळे, रा. कावळेवाडी या दोघांना काल रविवार दि. 13 जून रोजी ताब्यात घेउन नमूद चोरीतील तुषारसिंचनाचे 16 तोट्या जप्त केल्या आहेत.