उस्मानाबाद,दि.१४: 

पोलीस ठाणे, आनंदनगर: अविनाश शिवशंकर खानापुरे, रा. विजय चौक, उस्मानाबाद हे दि. 11.06.2021 रोजी शहरातील बसस्थानक समोर थांबले असतांना उस्मानाबाद येथील- हज्जु शेख यांनी त्यांना 150 ₹ मागीतले. पैसे देण्यास अविनाश यांनी नकार दिल्याने हज्जु शेख यांसह एका अनोळखी व्यक्तीने अविनाश खानापुरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अविनाश खानापुरे यांनी दि. 13 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, मुरुम: येणेगुर, ता. उमरगा येथील जावेद काझी, सय्यद काझी, मैनुद्दीन काझी, मुन्ना काझी अशा चौघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 09 जून रोजी 21.30 वा. सु. गावातील खंडोबा मंदीर समोर गावकरी- अल्लाउद्दीन मुल्ला यांसह त्यांचा भाऊ- मेहबुब यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या अल्लाउद्दीन मुल्ला यांनी दि. 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top