उस्मानाबाद दि.१४:  

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): चालक- सुनिल गोपिनाथ दांगट, रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद हे दि. 23.05.2021 रोजी 05.00 वा. सु. खानापुर येथील रस्त्याने वाहन क्र. एम.एच. 13 डीई 5931 ही निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रीत होउन रस्त्याबाजूच्या झाडास धडकून पलटली. या अपघातात वाहनातील सत्यजीत संजीव गाईन व विकास सुनिल इटकर, दोघे रा. बार्शी हे दोघे गंभीर जखमी झाले तर सत्यजीत गाईन हे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या विकास इटकर यांनी उपचारानंतर दि. 13 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उमरगा: चालक- गौसुदिन शेख, रा. राजेश्वर, ता. बसवकल्याण, जि. बिदर, राज्य- कर्नाटक यांनी दि. 13 जून रोजी 12.30 वा. सु. उमरगा येथील पर्यायी मार्गावरील अत्तार पेट्रोलीयम केंद्राजवळ ट्रक क्र. एम.एच. 25 यु 5269 हा निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला राकेश माडजे, रा. लातुर यांच्या उभा असलेला ट्रक क्र. एम.एच. 43 बीपी 0460 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गौसुदिन शेख हे स्वत: जखमी होउन दोन्ही ट्रकचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या राकेश माडजे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top