उस्मानाबाद,दि.१४:

   पोलीस ठाणे, कळंब: 1)अनिल शिंदे 2)गणेश इंगळे, दाधे रा. कळंब 3)बाळासाहेब वाघमारे, रा. बाभळगाव हे तीघे दि. 13 जून रोजी हासेगाव शिवारातील ‘जानताराजा हॉटेल’ समोर विदेशी दारुच्या 48 बाटल्या (किं.अं. 7,200 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

पोलीस ठाणे, ढोकी: 1)जनाबाई चव्हाण 2)सविता शिंदे, दोघी रा. राजेशनगर पारधी पिढी, ढोकी या दोघी दि. 12 जून रोजी राहत्या वस्तीवर गावठी मद्य निर्मीतीचा 600 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 24,000 ₹) बाळगलेल्या तर दुसऱ्या घटनेत 1)मनिषा चव्हाण 2)तोळाबाई चव्हाण, दोघी रा. कारखाना परधी पिढी, ढोकी या दोघी याच दिवशी राहत्या पारधी पिढीवर 20 लि. गावठी दारु व 200 लि.‍ शिंदी (एकुण किं.अं. 11,450 ₹) बाळगलेल्या असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

 

पोलीस ठाणे, वाशी: हिराबाई शिंदे, रा. शेंडी पाटी, ता. वाशी या दि. 13 जून रोजी आपल्या घरासमोर 9 लि. गावठी दारु (किं.अं. 680 ₹) बाळगलेल्या असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: साधना कोरे, रा. चिवरी पाटी, अणदुर या दि. 13 जून रोजी फुलवाडी शिवारातील ‘रसिका हॉटेल’ समोर देशी दारुच्या 6 बाटल्या (किं.अं. 180 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

            यावरुन पोलीसांनी गावठी मद्य निर्मीतीचा द्रव पदार्थ जागीत ओतून नष्ट केला व अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top