नळदुर्ग, दि.५ :
येथिल बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील हिंदी विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पंडीत गायकवाड यांनी आपला थकीत पगार न दिल्यास आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिला आहे.
कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथेल हिंदी विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पंडीत गायकवाड यांनी संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य, उच्चशिक्षण संचालक पुणे,सहसंचालक कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, माहे मार्च-२०१९ पासून कसलेही कारण नसताना माझा पगार महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी बंद केला आहे. यासंदर्भात नळदुर्ग महाविद्यालयाचे प्रचार्य ,उच्चशिक्षण संचालक पुणे व उच्चशिक्षण सहसंचालक औरंगाबाद यांच्या कडे मी दि.१४ मे २०२० ते १५ मार्च २०२१ पर्यंत वेळोवेळी लेखी व तोंडी पाठपुरावा करून मागणी केली असून दरम्यानच्या काळात औरंगाबाद येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालया समोर आमरण उपोषण आंदोलन ही केले आहे.
आमरण उपोषणाला बसलो असता संबंधित उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. डिगंबर गायकवाड यांनी लवकरच आपल्याला न्याय मिळेल असे लेखी अश्वासन दिले आहे. शिवाय संबंधित संस्था चालक हे ही वेळोवेळी माझी दिशाभूल करित असून अद्याप माझा पगार मला मिळालेला नाही. जर एक महिन्याच्या आत मला माझा पगार न मिळाल्यास मी दि.५ जुलै २०२१ रोजी संबंधित महाविद्यालया समोर किंवा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालया औरंगाबाद समोर आत्मदहन करणार असून यात माझे काही बरे वाईट झाल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड, संचालक डॉ. धनंजय माने व संबंधित संस्थाचालक हेच जबाबदार असतील असा लेखी इशारा दिला आहे.