तुळजापूर, दि. ५ :डॉ सतीश महामुनी

तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने हरीत तुळजापूर करण्याच्या उद्देशाने शहरातील नागरिकांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने घोषित केला आहे.

 यानिमित्ताने नागरिकांनी आपल्या आवडीचे झाड नगरपरिषदेच्या अग्निशामक परिसरात लागवड करावे. त्याचे संगोपन नगरपरिषद करेल असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन केंद्र तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे.  यामध्ये जांभूळ, चिंच, कडुनिंब, आंबा, लिंब,वडाचे झाड,रामफळ,पेरु इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे.

नगरपरिषदेने यापूर्वी केलेल्या वृक्षांचे वृक्षसंवर्धन करण्यात आले आहे.  तुळजापूर शहरातील नागरिकांनी आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन निसर्गाचा समतोल राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्ष सचिन रोचकरी व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी  तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांना केले आहे

 नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरातील कोणत्याही प्रकारचे वृक्ष अथवा रोपे उपलब्ध असल्यास ते अग्निशमन केंद्र येथे  स्वतःहून लावावे व त्या रोपांची संरक्षण देखभाल करण्याची जबाबदारी नगरपरिषद घेईल.   शहरातील नागरिकांनी आपणाकडे उपलब्ध असणारी रोपे वरील ठिकाणी लावून नगरपरिषदेस  सहकार्य करावे असेही आवाहन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केले आहे.

 सदर  नगर परिषद सदस्या सौ.रेशमा अविनाश गंगणे यांनी त्यांची मुलगी कु. परी अविनाश गंगणे हिच्या वाढदिवसा निमित्त दिलेल्या रोपांची लागवड नगराध्यक्षांच्या हस्ते केली कार्यक्रमासाठी  नगरसेवक पंडितराव जगदाळे युवा नेते विनोद गंगणे, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


तुळजापुर: भीमनगर येथे वृक्षारोपण 


जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तुळजापुरातील भीमनगर परिसरात सामाजिक कार्यकर्ते सागर कदम आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम केला आहे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिमनगर येथे बोधी (पिंपळ) वृक्ष, वटवृक्ष तसेच कडूलिबांच्या झाडाचे वृक्षारोपन करण्यात आले.

यावेळी येथील युवक कार्यकर्ते सागर कदम , संजय कदम, योगेश सोनवणे, गोकूळ कदम, सुशिल कदम, सुरज कदम, धनंजय वाघमारे, धर्मा भालेकर,  सुदर्शन कदम आदि उपस्थित होते.
 
Top