तुळजापूर, दि. १६ :

तीर्थ क्षेत्र  तुळजापूर येथे लहान व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये लहान व्यापाऱ्याला राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी बँकांनी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कर्ज  तातडीने मंजूर करावे अशी मागणी भारतीय  युवा मोर्चा युवक नेते उद्योजक राम चोपदार यांनी केली आहे.


कोरोना आपत्तीनंतर  परिस्थिती सुरळीत सुरू झाले आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून लहान साहान व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. हातामध्ये असणारी साधनसामुग्री नष्ट झाली आहे. त्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नव्याने आर्थिक पाठबळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राष्ट्रीयीकृत बँका सहकारी बँका तसेच नागरी पतसंस्था यांनी लहान व्यापाऱ्यांना तातडीने कर्ज मंजूर करून या अडचणीतून  बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन व्यापाऱ्यांच्या वतीने केले आहे.

संपूर्ण शहराचे अर्थकारण तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे आणि मंदिर  बंद असल्यामुळे आर्थिक चक्र अद्याप थांबलेले आहे. परंतु दुकानदारी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बळ देण्यासाठी सर्व ग्राहकांनी सहकार्याची भूमिका घेणे, या काळात अत्यंत गरजेचे आहे.
अशी भूमिका या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाचे , उद्योजक राम चोपदार यांनी  माध्यमांशी बोलताना मांडली. 

याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बागल, भाजपचे युवा नेते सागर पारडे, विनोद कदम यांची उपस्थिती होती.
 
Top