उस्मानाबाद,दि.२२
पोलीस ठाणे, परंडा: शेतात लागवड केलेल्या जिरेनियम रोपांची वाढ असमाधानकारक असल्याने त्या रोपांचा खर्च वैभव हेळकर, रा. रोसा, ता. परंडा यांच्याकडून वसूल करण्याच्या उद्देशाने परंडा येथील सुरज केदारे व विजय मेहेर यांनी वैभव हेळकर यांना परंडा येथे कुर्डूवाडी रस्त्यावर बोलावून घेतले. यावर हेळकर हे दि. 19 जून रोजी 18.00 वा. तेथे गेले असता नमूद दोघांसह अन्य सहा अनोळखी पुरुषांनी हेळकर यांना धमकावून शेतातील खोलीत डांबून मारहान केली व हेळकर यांचा भ्रमणध्वनी हिसकावून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हेळकर यांनी दि. 21 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 342, 365, 504, 506, 143, 147 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सोनगाव, ता. उस्मानाबाद येथील मारुती कांबळे यांनी गावकरी- सतीश व केराबाई चांदणे यांना उसने दिलेले 500 ₹ कांबळे यांनी दि. 21 जून रोजी परत मागीतले असता नमूद पती- पत्नींनी कांबळे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.